हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पृथ्वीवर अनेक खगोलीय घटनांचा परिणाम होत असतो. यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणजे सूर्यग्रहण होय. सूर्यग्रहण लागले की घराबाहेर पडू नये, ते कधीच डोळ्यांनी पाहू नये, असे सांगितले जाते. त्याचबरोबर, गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणावेळेस जास्त काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतो. त्यामुळेच सूर्यग्रहण कधी आहे कोणत्या दिवशी आहे किती काळासाठी आहे हे जाणून घेण्याबद्दल अनेकांची उत्सुकता असते. आज आम्ही याच संदर्भात माहिती देणार आहोत.
वर्षाचे पहिले सूर्यग्रहण कधी?
2024 पहिले ग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच 24 मार्च रोजी आहे. तर वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी असेल. हे ग्रहण रात्री 09:12 ते मध्यरात्री 01:25 पर्यंत सुरू असेल. म्हणजेच या सूर्यग्रहणाचा कालावधी 4 तास 25 मिनिटे इतका आहे. हे ग्रहण म्हणजे खग्रास ग्रहण असेल.
सूर्यग्रहण कोठे दिसणार?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण पश्चिम युरोप पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक मेक्सिको, उत्तर अमेरिका कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा उत्तर पश्चिम प्रदेश, आयर्लंड या भागामध्ये दिसणार आहे. परंतु हे ग्रहण भारत आणि जवळील देशांमध्ये दिसणार नाही.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते जिथे चंद्र काही काळासाठी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचत नाही. यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. यामुळे चंद्र जास्त गडद दिसतो. सूर्याच्या या अवस्थेलाच सूर्य ग्रहण म्हणले जाते.