औरंगाबाद | नाश्ता करताना हॉटेल मध्ये विसरलेले सोन्याचे मंगळसूत्र हॉटेल चालकाने पोलीसांच्या स्वाधीन केले. हॉटेल चलकांचा या प्रामाणिक पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आप्पासाहेब श्रीराम घोडे वय-37 यांची जालना रोडवर त्रिमूर्ती अप्पा नाश्ता सेंटर नावाने छोटेखानी हॉटेल आहे. 14 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांच्या हॉटेल मध्ये त्यांना सोन्याचे मणी मंगळसूत्र आढळून आले. त्या मंगळसूत्राबाबत त्यांनी परिसरात चौकशी केली. मात्र ज्यांचे मंगळसूत्र हरवले असे कोणीही समोर आले नाही. शेवटी घोडे यांनी प्रामाणिकपणा दाखवत थेट गुन्हा शाखा गाठली व पोलिस निरीक्षक अविनाश आघाव व उपनिरीक्षक योगेश धोंडे यांची भेट घेतली व मिळालेले 40 हजार रुपये किमतीचे ममंगळसूत्र निरीक्षक आघाव यांच्या स्वाधीन केले.
एकीकडे चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडून नेटत असताना एक नाश्ता विक्री करणाऱ्या तरुणांचा प्रामाणिकपणा पाहता गुन्हेशाखेकडून घोडे यांचा सत्कार करण्यात आला. हे दागिने ज्याचे असतील त्यांनी मालकी हक्काचे कागदपत्र दाखवत गुन्हे शाखेकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.