जहाजाने धडक देताच पुल पत्त्यासारखा कोसळला नदी पात्रात; Video पाहून अंगावर येईल काटा

Bridge collage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पहाटे अमेरिकेतील (America) मेरिलँडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिज (Francis Scott Bridge) भले मोठे जहाज धडकल्यामुळे पत्त्यासारखा कोसळला आहे. याबाबतची माहिती सीएनएनकडून देण्यात आली आहे. हा पूल थेट नदी पात्रात कोसळल्यामुळे अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. आता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ही वाहने पुन्हा वर काढली जात आहे. सध्या या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा पूल कसा कोसळला हे स्पष्टपणे दिसत आहे. (Bridge Collapse)

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या वेळीच म्हणजेच दीड वाजायच्या सुमारास पुल कोसळल्याची घटना घडली आहे. त्यावेळी अनेक जहाजे फ़्रांसिस स्कॉट की ब्रिज खालून ये जा करत होती. परंतु याचवेळी एक जहाज पुलाच्या खांबावरच जाऊन धडकले. त्यामुळे त्या जहाजालाही आग लागली आणि ते पाण्यात बुडाले. यानंतर काही क्षणातच पुल देखील पत्त्यासारखा पाण्यात कोसळला. यामुळे इतर वाहने पाण्यात बुडाली.

सांगितले जात आहे की, या दुर्घटनेमध्ये सातपेक्षा अधिक लोक नदीच्या पाण्यामध्ये पडले असावेत. या सर्वांना शोधण्याचे काम बचाव पथकाकडून सुरु आहे. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर अग्निशामक विभागाचे जवान देखील आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेत पाण्यात बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ही या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये आपण पाहू शकतो, जहाजेने धडक दिल्यानंतर पुल कशा पद्धतीने पाण्यात कोसळला.