सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा : माण तालुक्यात लसीकरणाच्या ठिकाणी कोरोनाचे नियम वाऱ्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माण | कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. मात्र माण तालुक्यामध्ये काही ठिकाणी लसीकरणाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.

लसीकरणांसाठी सुरुवातीला दुसऱ्या डोसमध्ये असलेले अंतर प्रशासनाने वाढविल्याने अधिक अडचणी येत आहेत. तर लसीकरिता रांगेत येवून उभे राहून पुन्हा लस नसल्याचे सांगितले जात आहे. तेव्हा मनस्ताप सहन करात लस न घेताच परतावे लागत आहे. शिवाय आता तिसऱ्या लाटेविषयी बोलले जात आहे. तेंव्हा लसीकरणावर प्रशासनाने भर द्यायला हवा. सध्या ग्रामीण भागात लसीचा तुटवडा जाणवत आहे.

ग्रामीण स्तरावर नोंदणी केंद्रे उभारून आणि लोकांना नोंदणी करण्यासाठी गती देण्याकरिता ग्राम पंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, इ. महत्त्वाच्या प्रभावशाली व्यक्तींचा वापर करून हे करता येऊ शकते. सर्व वयोगटासाठी शासनातर्फे सर्वसमावेशक लसीकरण नोंदणीसाठी अनुमती मिळेपर्यंत हे एक महत्त्वाचे धोरण राहू शकते.

ग्रामीण भागांमध्ये, सर्वप्रथम समुदायांमध्ये लस म्हणजे काय आणि तिचा हेतू यांविषयी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. अशा प्राथमिक माहितीच्या अभावी लोक अफवा आणि गैरसमजांना बळी पडतात. माण तालुक्यामध्ये सुरू असलेल्या लसीकरणा केंद्राच्या ठिकाणी इंटरनेटच्या अडचणी निर्माण झाली आहे.

वशिलेबाजी थांबणार केव्हा ?

अनेक केंद्रामध्ये लसीकरणाच्या वेळी स्थानिक नेते कार्यकर्ते ,आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत वशिलेबाजी करत असल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य कर्मचारी आपल्या ओळखीच्या लोकांना पहिल्यांदा लस देतात अशी चर्चा सर्वसामान्य जनता करत आहे. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने आरोग्य विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

इंटरनेट ठरत आहे अडचण ?

लसीकरणाच्या वेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना इंटरनेटच्या अभावामुळे लोकांना जास्त वेळ लसीकरण केंद्राच्या ठिकाणी थांबावे लागत आहे. त्यामुळे इंटरनेटचा प्रश्न सोडवणे सुद्धा गरजेचे आहे. तांत्रिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गरज सुद्धा अनेक ठिकाणी आहे

Leave a Comment