पुणे प्रतिनिधी| पुण्याच्या बुधवार पेठेत मागील काही शतकापासून देह विक्रीचा व्यवसाय चालतो. याच पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीवर ॲसिड फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या ॲसिड हल्ल्यात पीडित तरुणी बचावली असून सुदैवाने तिला जास्त इजा झाली नाही. तिच्या गिऱ्हाईकानेच तिच्यावर ॲसिड हल्ला केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे
मूळची पश्चिम बंगालची असणारी २२ वर्षीय तरुणी पुण्याच्या बुधवार पेठेत एका इमारतीमध्ये देह विक्रीचा व्यवसाय करते. ज्या गिऱ्हाईकाने तिच्यावर हा ॲसिड हल्ला केला आहे तो त्या तरुणीचे नेहमीचे गिऱ्हाईक आहे. तो शिवाजी नगर येथील एका हॉटेल मध्ये भांडी धुण्याचे काम करतो. १३ जूनच्या दुपारी तो त्या तरुणीकडे आला असता त्याने हा प्रकार केला आहे.
आश्चर्य ! सात जन्मात हि बायको नको म्हणत पिडीत नवऱ्यांनी साजरी केली वड पौर्णिमा
आरोपीच्या हातात असणारा स्मार्ट फोन देह विक्री करणाऱ्या तरुणीने हिसकावून घेतला म्हणून हा सर्व प्रकार घडला. मोबाईल हिसकावून घेतला म्हणून चिडलेल्या आरोपीने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. त्यात त्या तरुणीच्या चेहऱ्याला इजा झाली. तसेच ॲसिड डोळ्यात गेल्याने जोर जोरात आरडा ओरडा करणाऱ्या तरुणीला शेजारील महिलांनी खासजी रुग्णालयात नेहले. पोलिसात या घटनेची फिर्याद देताच पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले.