औरंगाबाद | एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे एमपीएससीची परीक्षा सतत पुढे ढकलला जात होती. पण आता येणार्या 31 डिसेंबर पर्यंत राज्यभरात पाच हजार जागांची पोलीस भरती झालेली असेल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
सोमवारी औरंगाबाद येथे शहर पोलीस दल आणि औरंगाबाद परिक्षेत्राच्या आढावा बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना सांगितले.मंत्री वळसे पाटील यांनी सोमवारी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, तसेच दाखल झाल्यानंतर गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण आदींचा आढावा घेतला. या पदभरतीनंतर सुद्धा 7 हजार पोलिसांची पुन्हा नव्याने भरती करणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल काही गुन्हे मागे घेतलेले आहेत. आता उर्वरित गुन्हेही मागे घेतले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी होत आहे. त्याचबरोबर दोन समाजामध्ये वादावादी आणि गावात संघर्ष निर्माण होण्याच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी ग्रामीण पोलिसांनी भर दिला याबाबत त्यांनी पोलिसांचे कौतुकही केले. ‘कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांच्या अनुकंपा भरती बद्दल सरकारचे धोरण अजून सुस्पष्ट असून हा निर्णय आयुक्त स्तरावर आणि पोलीस अधीक्षक स्तरावर होईल. त्याचबरोबर कोरोना युद्धांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीला पन्नास लाख रुपये दिले आहे असेही वळसे-पाटील म्हणाले. दरम्यान, शहरातील रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीचा आयुक्तालयातील नियंत्रण विभाग पाहिल्यानंतर एखादा रस्ता झुम करुन दाखवा अशा सुचना गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या असता पोलिसांनी शहरातील रस्त्यावरील सीसीटीव्ही झुम करुन दाखविला. पोलिसांना चांगले कार्यालय, घर मिळावे यासाठी पूर्णपणे मदत करणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी पोलिस महांचालक संजय पांडे, आयुक्त डॉ. निखील गुप्ता, आयजी एम. प्रसन्ना, ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह औरंगाबाद परिक्षेत्रातील संबंधित जिल्ह्याचे अधीक्षक, आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.