हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान,पीडित महिलेच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहायता निधीतून तसेच शासनाच्या विविध योजनांमधून 20 लाखांची मदत केली जाणार असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल”, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली.
दरम्यान, सदर आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कस्टडीत आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे तसेच आरोपीने सर्व घटनेची माहिती दिली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एससी एसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.