औरंगाबाद : आज वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात अली. डॉ. धर्मराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेण्यात अली. भटके विमुक्तांचे व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे व हलगर्जीने रद्द झाले. असे चव्हाण यांचे म्हणणे आहे .
ओबीसीच्या व भटके विमुक्तांच्या नावाखालीजे आरक्षणाचे लढे उभे राहत आहेत. ते सर्व लढे जनतेची दिशाभूल करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आखलेला डाव आहे. आरक्षणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना कोर्टाने मागितलेला इम्पेरीयल डाटा राज्यसरकारने सादर केला नाही. तसेच आवश्यक माहिती न दिल्याने आरक्षण रद्दची झळ भटके विमुक्त व ओबीसींना सोसावी लागत आहे. राज्य सरकार स्वताचा हलगर्जीपणा झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. अथवा रोहिणी आयोग स्वीकारण्यात यावा व ओबीसींचे त्रिस्तरीय वर्गीकरण करावे. असे ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणले.
यावेळी, जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम योगेश गुलाबराव बन, जिल्हा सदस्य औरंगाबाद पश्चिम श्रीरंग ससाणे, शैलेन्द्र मिसाळ, पंडितराव तुपे आदींची उपस्थिती होती.