हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असतानाच आता संभाजी भिडे यांनी यामध्ये उडी घेतली असून राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावे, अशी थेट मागणी त्यांनी केली आहे.
राज्याला महसूल मिळावा यासाठी समाजाला विघातक निर्णय घेणे चुकीचे आहे. किराणा दुकानात वाईन उपलब्ध करून राज्य शासनाला नेमके काय साधायचे आहे हा प्रश्नच आहे,” असंही भिडे म्हणाले. महाराष्ट्राने संपूर्ण देशाला देशपण आणि भवितव्य दिले आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्या सरकारविरोधात सर्व संघटनांनी आता लढा उभारला पाहिजे असे त्यांनी म्हंटल.
दारूला जर मुक्तता दिली जात असेल तर मग गांजा शेतीला का आडवे लावले जातेय? असा सवालही संभाजी भिडे यांनी केला. गांजा शेतीला परवानगी द्या असे म्हणाणारा हा समाज असल्याचे ते म्हणाले. दारुच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मंत्रिमंडळशी बोलणार आहे. वाईनचा निर्णय मागे घ्यावा याबाबतची मागणी करणार आहे.