स्मशानात अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे चक्क कुत्र्यांनी तोडले लचके; संतापजनक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | खनभाग येथे राहणार्‍या मयत इंदू जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार केल्यानंतर अर्धवट अवस्थेत जळालेल्या मृतदेहाचे मनपा कर्मचार्‍यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुत्र्यांनी लचके तोडून त्याचे तुकडे पळवले. या प्रकारामुळे जनमत संतप्त झाले असून यानिमित्ताने महापालिकेचा गलथान कारभार पुन्हा समोर आला आहे.

असले प्रकार घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा येथून पुढे मनपा मुख्यालयसमोर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी निवदेनाद्वारे दिला आहे.

दोनच दिवसांपूर्वी असाच प्रकार मिरजेतील कृष्णा घाटावर घडला असल्यामुळे सांगलीतील नागरिकांची मरणानंतरही हेळसांड थांबत नसल्याचे दिसून आले असून हा सर्व कारभार हा ‘रामभरोसे’ असल्याचे सिद्ध झाले आहे.

खणभागात राहणार्‍या इंदू जाधव यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर नातेवाइक घरी परतल्यानंतर तेथे असणारा सुरक्षा रक्षक झोपी गेला. हीच संधी साधून तेथील भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या इंदू जाधव यांच्या पार्थिवाचे लचके तोडले. केवळ लचके तोडले असे नसून ते घेऊनही कुत्री बाहेर आली.

त्यानंतर सकाळी अमरधाम स्मशानभूमीत सुनील शिंदे हे अन्य कारणासाठी तेथे गेले असता त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी मनपा कर्मचार्‍याची शोधाशोध केली. त्यांना तो झोपलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ त्यांना उठवून घडलेला प्रकार सांगितला.

तसेच जाग्यावरू आणून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्या कर्मचार्‍याने विखुरलेले मृतदेहाचे तुकडे गोळा करून परत दहन केले. हा प्रकार समजताच सर्वत्र संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या कारभाराबाबत तिव्र नापंसती व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment