ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने दुर्लक्षित घटकांना माणुसकीचा हात

0
49
humanity foundation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पुणे

संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटात कोणीही उपाशी राहू नये. प्रत्येक व्यक्तीची भूक जाणली पाहिजे, महामारी संपेल पण माणुसकी जपा, असा संदेश देत ह्यूमॅनिटी फाऊंडेशनच्या वतीने समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना मदतीचा हात दिला आहे. फाउंडेशन च्या वतीने कोथरूड येथे तृतीपंथीयांच्या कार्यकर्त्या सोनाली दळवी यांच्याकडे तृतीयपंथीयांसाठी धान्य कीट सुपूर्त करण्यात आले.

यावेळी ह्यूमॅनिटी फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमेल रझा, मुर्तुझा शेख, अरबाज शेख, तृतीयपंथी कार्यकर्त्या सोनाली दळवी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना कुमेल रझा म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात अनेकांवर वाईट परिस्थिती ओढवली आहे. अशावेळी नागरिकांनी माणुसकी दाखवली पाहिजे. एकमेकांना मदत केली पाहिजे. तृतीयपंथी हा आपल्या समाजातील सर्वाधिक दुर्लक्षित घटक आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.

सोनाली दळवी म्हणाल्या. कोरोनाच्या काळात आमची दखल ना राज्यसरकारने घेतली ना केंद्राने घेतली. आम्ही कोणाकडे मदत मागायची? परंतु आज ह्युम्यानिटी फाऊंडेशन च्या मदतीने आम्हाला आधार मिळाला आहे. अशी प्रतिक्रिया तृतीय पंथीयांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here