आरोग्य विभागाकडून आता कोरोनासोबतच डेंगूचीही केली जातेय टेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्यात डेंग्यूचे आतापर्यंत 13 रुग्ण रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी खबरदारी म्हणून शहरात दररोज दोन हजारापेक्षा अधिक संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. एखाद्या रुग्णाला ताप असेल तर त्याची डेंग्यूची टेस्टी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. पावसाळ्यात रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते.

कोरोनाची तिसरी लाट कधी येईल, यासंदर्भात आयएमआरने अधिकृतपणे काहीही जाहीर केलेले नाही. वेगवेगळ्या तज्ञांनी तिसऱ्या लाटे संदर्भात आपला अंदाज व्यक्त केला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही लाट ऑगस्ट अखेरीस येईल, असे वाटते आहे. शहरात, जिल्ह्यात डेटा प्लस किंवा तत्सम असा कोणताही व्हायरस आढळला नाही. मुंबईत किंचित रुग्ण संख्या वाढू लागली आहे. तिसऱ्या लाटेचे हे संकेतही असू शकतात, असे मनपाला वाटते आहे. त्यामुळे डेंग्यू आणि कोरोना एकाच वेळी येण्याचा धोका वाढत चालला आहे. 2019 मध्ये औरंगाबाद शहरात डेंग्यूने धुमाकूळ घातला होता.

हजारापेक्षा अधिक रुग्ण जेव्हा वाढले होते. 67 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. मागील वर्षी डेंग्यूचे रुग्ण सापडले नव्हते. यंदा रुग्ण वाढतील असा अंदाज आहे. महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांना या संदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. डेंग्यूची स्वतंत्र टेस्ट केली जाते. या टेस्टला आयजीएम म्हणतात. टेस्टमुळे रुग्ण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे लक्षात येते. जुलै महिना डेंग्यू प्रतिरोध महिना म्हणून पाळण्यात येत आहे. या जनजागृतीसह आजाराच्या प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरडा दिवस पाळणे, भंगार, कचऱ्याच्या ठिकाणी पाणी साचू न देणे, पिण्याचे पाणी साठविताना काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाने केली आहे.

Leave a Comment