सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने कहर माजवला आहे. जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकंबे या गावात कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला आहे. दिवसभरात केल्या जाणाऱ्या टेस्टिंगच्या ५० टक्के रूग्ण गावात सापडत असल्याने प्रशासनासह लोकांच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकंबे या गावी गेल्या काही दिवसापासून गंभीर परिस्थिती बनलेली आहे. या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने कहर माजवला आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये कोरोनाने शांतता पसरली आहे. कोरोनाच्या भीतीने लोक घराबाहेर येण्यास भीत आहेत. शेतातील कामे सुद्धा थांबलेली आहेत, गावात घरटी एक कोरोना पेशंट अशी परिस्थिती एकंबे गावामध्ये झालेली आहे. यामुळे हे गाव सध्यातरी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. या गावांमध्ये पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन गावात सॅनिटायझर करत आहे. गावाचे पोलीस पाटील गावात कोणालाही बिना कामाच फिरुन देत नाही.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज १०० टेस्टिंग केले असता, कमीत कमी निम्मे पेशंट हे कोरोना बाधित सापडत आहेत. गेल्या तीन दिवसापासून रोज शंभर करोना टेस्ट केल्यानंतर किमान पन्नास ते साठ यादरम्यान कोरोना बाधित पेशंट सापडत आहेत. गेल्या दोन दिवसांत दोन पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या सोबत प्रशासनाची डोकेदुखी वाढलेली आहे.
गावाला बेफिकीरपणा नडला
मागच्या वर्षी एकंबे या गावात कोरोनाचा एकही पेशंट नव्हता. परंतु या गावातील गावकऱ्यांनी शासनाने घालून दिलेल्या कुठल्याही नियमांचं पालन केलं नसल्याने मागील काही दिवसापासून या गावात कोरोनाने कहर माजवला आहे. गावातील लोक मागील काही दिवसांमध्ये तोंडाला मास्क न लावणे, सॅनिटायझर न वापरणे अशा पध्दतीने वागत होते. परंतु गेल्या चार दिवसापासून येथे कोरोनाने थैमान घातल्यामुळे आता व गावकरी पूर्णपणे भयभीत झाले असून गावात किर शांतता पसरली आहे.
आरोग्य सेविका व ग्रामदक्षता समिती सतर्क
एकंबे गाव आहे कोरेगाव पासून सात किलोमीटर लांब असून गेल्या काही दिवसापासून येथे कोरोनाचे मोठ्या प्रमाणात पेशंट सापडले आहेत. ग्रामदक्षता समिती गावात सतर्क झाले आहेत. गावात आरोग्य सेविका घरोघरी जाऊन कोण आजारी आहे का? कोणाला कोरोनाचे काही लक्षण जाणवत आहेत का? याची चौकशी करत आहेत.
उशिरा शहाणपण आले देवा…
गावात गेल्या काही दिवसापासून करोनाने कहर केल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करता येत नाहीत. आबालवृद्धांना बाहेर पडता येत नाही. आता गावातील सर्व लोक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. सॅनिटायझरचा वापर करत आहेत.
बिनकामाचा फिरणाऱ्यावर खाकीची कारवाई
गावात कोणी विनाकारण फिरल्यास पोलिसांच्या कारवाई सामोरे जावे लागेल गावातील कुणीही बिना कामाचा फिरू नये प्रशासनाला सहकार्य करावे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा