मुलीला सोडायला गेलेल्या महिलेचे भरदिवसा फोडले घर; लाखोंचा ऐवज लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी | जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. शनिवारी सकाळी दहा ते एक वाजे दरम्यान चोरट्यांनी घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने रोकड असा एकूण 2 लाख 65 हजारांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शहरातील व्यंकटेश नगरात घडली. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील व्यंकटेश नगरातील महिला शीला दत्ता सिंगाडे आपल्या मुलीला शिक्षणासाठी औरंगाबाद येथे सोडण्यासाठी केल्या होत्या. त्यामुळे घराला कुलूप होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. घरात घुसून घरातील कपाटातील 30 हजार रूपये सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास करीत चोरटे पसार झाले.

ही घटना शनिवारी महिला घरी आल्यानंतर तिच्या निदर्शनास आली. याप्रकरणी शीला शिंगाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोरगावकर करीत आहेत. यापूर्वीदेखील शहरात भरदिवसा घरफोडीचे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment