Monday, January 30, 2023

डोनाल्ड ट्रंम्प यांना दिलेले इंजेक्शन आता औरंगाबादेतील रुग्णांना…

- Advertisement -

औरंगाबाद | अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प कोरोना झाला होता तेव्हा जे इंजेक्शन देण्यात आले होते ते इंजेक्शन आता औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांना देण्यात येणार आहे. त्या इंजेक्शनचे नाव ‘अँटीबॉडी कॉकटेल’ असे आहे. कोरोना बाधित असताना डोनाल्ड ट्रंम्प यांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ हे इंजेक्शन वापरण्यात आले होते. आता हेचे नवीन औषध कोरोनाच्या उपचारासाठी शहरात दाखल होत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत मोठा कहर झाला. कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य यंत्रणाही हतबल झाली. रेमडेसिवरपासून अनेक प्रकारची औषधी आणि उपचार पध्दतीचा आतापर्यंत वापर झाला. औरंगाबादेत कोरोनाचा जोर आता ओसरला आहे. त्यामुळे दिलासा व्यक्त होत आहे. परंतु आजही दोनशेच्या घरात कोरोना रुग्णांचे निदान होत आहे. यात गंभीर प्रकृती होणार्‍या रुग्णांचे प्रमाण कायम आहे. अशा गंभीर रुग्णांवर घाटी रूग्णालयात प्राधान्याने उपचार केले जातात. याच घाटी रुग्णालयाला आता अँटीबॉडी कॉकटेल हे डोस मिळणार आहेत कॉकटेल म्हटले की अनेकांच्या भुवया उंचावतात परंतु हे अँटीबॉडी कॉकटेल आहे. हेच औषध कोरोना झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आले होते. त्यामुळे ते अँटीबॉडी कॉकटेल चर्चेत आले होते.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अँटीबॉडी कॉकटेल हे औषध भारतात दाखल झाले होते. आणि आता घाटी रूग्णायला याचे 750 डोस देण्यात येत आहेत. अँटीबॉडी कॉकटेलचा वापर सौम्य ते मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाची गंभीर लक्षणे उद्भवत असताना हा डोस घेतल्यास यामुळे आॉक्सिजन पातळी कमी होत नाही असा दावा होत आहे.