पिक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटनेने उगारले आसूड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यासाठी बँका सतत टाळाटाळ करत आहेत. त्यात अजून भर म्हणजे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक हा तर गंभीर विषय होत चालला आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकांवर जनशक्ती शेतकरी संघटना आसूड उगारणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

शिवसेनेचे राज्य असतांना, त्यांच्या राज्यातही शेतकरी व त्यांच्या मुलांची होरपळ सुरूच आहे. अनेक शेतकरी संघटना विविध पक्षांच्या दावणिला बांधल्याने शेतकऱ्यांचा व त्यांच्या पाल्यांचा वाली कोणी राहिला नाही. त्यांना मदत करण्यासाठी तसेच सर्वसामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटना ठामपणे उभी राहणार असल्याचेही सूतोवाचन पत्रकार परिषदेत केले. औरंगाबद शहर शिवसेनेचा गड असूनही शहरात आठवड्यातून एकदा पाणी येते ही शरमेची बाब आहे. शासनाबरोबरच निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आहे. यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी पेरणीसाठी अनुदान देण्याचीही मागणी यावेळी केली.

एमपीएस्सी पास होऊनही वर्षानुवर्षे नियुक्ती मिळत नसल्याने स्वप्नील लोणकरला आत्महत्या करावी लागली. या आत्महत्येनंतर सरकारने ३१ जुलै पर्यंत सर्वांना नियुक्त्या देण्याची सरकारने घोषणा केली आहे. या घोषणेची अमलबजावणी नाही झाली तर ३१ जुलै नंतर मोठे आंदोलन उभारणार असल्याची माहिती खुपसे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला खुपसेसह रऊफ पटेल, प्रभाकर भुसारे, कल्याण शिंदे, बंडू बोबडे, प्रभुनाना शेजूळ, संतोष घाडगे, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Comment