हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे आज बंगळुरु येथे दाखल झाले आहेत. राज्यातील भाजप सरकार सत्तेचा दुरुपयोग करीत आहे. आमच्याकडे स्वतःची राजकीय रणनीती आहे, परिस्थिती कशी हाताळायची हे आम्हाला ठाऊक आहे.मला कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याची इच्छा नाही. असे डिके शिवकुमार यांनी सांगितले. रामदा हॉटेल समोर केलेल्या उपोषणाबाबत ते बोलत होते.
दरम्यान काँग्रेस नेता दिग्विजय सिंह काँग्रेसच्या २१ आमदारांना भेटायला गेले होते. मात्र पोलीस त्यांना आमदारांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये सोडत नाहीत माहिती मिळाली आहे. पोलीस ते तिथून जाण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र दिग्विजय सिह तिथून निघायचं नाव घेत नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अहेतियातन हिरास्टिन मध्ये ठेवल आहे.
पोलीस मला या आमदारांना बेतून देत नाहीत. मी मध्यप्रदेशचा राज्यसभा उमेदवार आहे त्यामुळे मला या आमदारांना भेटणं खूप गरजेचं आहे. कारण २६ मार्च ला मतदान आहे. माझ्या आमदारांना इथं ठेवण्यात आलं आहे आणि आता त्यांना भेटून पण दिल जात नाही. त्यामुळे मला पोलिसांकडून खूप त्रास दिला जात आहे. दिग्विजय यांनी सांगितलं. या प्रकाराने मध्यप्रदेश एक राजकीय वादळ निर्माण झाले आहे.