आता लॅप्स झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करता येईल; लेट फीसमध्येही मिळेल सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अनेक वेळा असे घडते की, विमाधारक आपल्या लाइफ इंन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) पॉलिसीचा दीर्घकाळ प्रीमियम भरू शकत नाही. यामुळे पॉलिसी संपुष्टात येते. LIC आपल्या ग्राहकांना अशी लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी देते आहे. आपल्या बंद झालेल्या पॉलिसीला पुन्हा सुरु करण्यासाठी LIC एक विशेष योजना देखील ऑफर करते, ज्यामध्ये लेट फीस सह काही शुल्क देखील माफ केले जातात.

अगदी अलीकडेच LIC ने अशी एक विशेष योजना (LIC Special Revival Scheme) आणली आहे ज्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बंद झालेली पॉलिसी 25 मार्चपर्यंत पुन्हा चालू करता येईल.तसेच या पॉलिसीची लेट फीस ही माफ केली जात आहे. या व्यतिरिक्त LIC बंद झालेली इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी इंस्टॉल्मेंट रिवाइवल स्कीम आणि लोन सहित रिवाइवल स्कीम देखील चालवते.

लॅप्स झालेल्या LIC पॉलिसीचे रिन्यूअल कसे करावे ?
सध्या ग्राहकांना बंद झालेली इन्शुरन्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची सुवर्णसंधी आहे. स्पेशल रिवाइवल कॅम्पेन योजनेचा लाभ 25 मार्च 2022 पर्यंत घेता येईल. प्रीमियम भरण्याच्या कालावधीत ज्या पॉलिसी लॅप्स झाल्या आहेत आणि ज्या पॉलिसीची मुदत अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या एकदाच रिव्ह्यू केल्या जाऊ शकतात. स्पेशल रिवाइवल कॅम्पेन अंतर्गत, पात्र योजनेसह पॉलिसी प्रीमियम न भरल्याच्या पहिल्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुन्हा सुरु केल्या जाऊ शकतात.

तुम्हाला 20 ते 30% पर्यंत सूट मिळेल
LIC टर्म इन्शुरन्स आणि हाय रिस्क प्लॅन वगळता, इतर सर्व पॉलिसी आतापर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या आधारावर लेट चार्ज माफ करत आहेत. एलिजिबल हेल्थ अँड मायक्रो विमाइन्शुरन्स प्लॅन देखील लेट चार्ज माफीचा लाभ घेऊ शकतात. LIC ने म्हटले आहे की, 1 लाख रुपयांच्या वार्षिक प्रीमियमसह पॉलिसींवर 20% किंवा कमाल 2 हजार रुपयांची सूट मिळेल. 1 लाख ते 3 लाख रुपये वार्षिक प्रीमियम असलेल्या पॉलिसींना 25% किंवा कमाल 2,500 रुपयांची सूट मिळेल. 3 लाख 1 रुपये आणि त्याहून अधिकच्या प्रीमियम असलेल्या पॉलिसींवर 30% किंवा कमाल 3 हजार रुपयांची सूट दिली जाईल.

पॉलिसीची मुदत पूर्ण करणे आवश्यक आहे
या स्पेशल रिवाइवल कॅम्पेन अंतर्गत, पॉलिसीची मुदत पूर्ण करणाऱ्या आणि प्रीमियम भरण्याच्या अटी पूर्ण करणाऱ्या पॉलिसींचा समावेश केला जाईल. ज्या ग्राहकांना काही कारणांमुळे प्रीमियम वेळेवर भरता आलेला नाही, त्यांच्यासाठी हे कॅम्पेन सुरू करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. सध्याच्या पॉलिसींमध्ये, जुन्या पॉलिसींसाठी जे काही कव्हर असेल ते तुम्हाला मिळेल.

पॉलिसी पुन्हा सुरू करणे फायदेशीर आहे
जर एखाद्या व्यक्तीने अनेक वर्षांपासून इन्शुरन्स पॉलिसीचे हप्ते भरले असतील आणि काही कारणास्तव तो आता बंद असेल, तर ती पॉलिसी पुन्हा सुरु करणे फायदेशीर आहे. जर आम्ही ती पॉलिसी सुरु केली केली नाही, तर भरलेला प्रीमियम व्यर्थ जाईल, कारण आपल्याला या पॉलिसीचा कोणताही लाभ मिळणार नाही.

Leave a Comment