पोकलेनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्याने तरुणास मारहाण

फलटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

पोकलेन मशिनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत का भरले नसल्याचे विचारत फलटण तालुक्यातील मठाचीवाडी येथील एका तरुणास मारहाण केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी घेतली. या प्रकरणी चार जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी अनिल जगन्नाथ शिंदे (वय ३२ वर्षे, रा मठाचीवाडी, ता. फलटण) व त्यांचा मेव्हणा रमेश बाऊसो बुधनवर या दोघांनी श्रेयी इक्वीपमेंट फायनान्स लि. पुणे यांच्याकडून पोकलेन मशिन घरेदी करण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी २०२० रोजी ४२ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतलेले होते. दरम्यान, दि. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास इक्बीपमेंट फायनान्स लि. पुणेचे अधिकारी अरिंदम आचार्य व पंकज गायकवाड तसेच त्यांच्या सोबत इतर दोन व्यक्ती गाडीतुन मठाचीवाडी येथे आले.

यावेळी त्यांनी अनिल शिंदे यांच्या घरासमोर कर्जाचे हफ्ते वेळेत का भरले नाही असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी शिंदे यांना तुमच्या नावचे कोर्टाचे वॉरंट आहे. तुम्हाला आमचे सोबत पुण्याला यावे लागेल असे सांगितले. त्यावेळी शिंदे मोटरसायकलवरून त्यांच्या सोबत जाण्यास निघाले. त्यावेळी फायन्सास कंपनीचा पंकज गायकवाड फिर्यादी यांच्या मोटर सायकलवर पाठीमागे पिंप्रद येथे पेट्रोल पंपंच्या थोडे पुढे गेल्यावर अरिंदम आचार्य याने त्याची लाल रंगाची चार चाकी गाड़ी शिंदे यांच्या मोटार सायकलपुढे आडवी मारली. तसेच त्यांना थांबवत त्यांच्या गाडीची चावी काढुन त्यांना गाडीत बसविले.

गाडीत बसवल्यानंतर शिंदे यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी अनिल शिंदे यांनी मारहाण केलेल्या चार जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच त्यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.