वर्षाची शेवटची तारीख 12/31/23 तुमच्यासाठी आहे खास! हे आकडे देतायेत विशेष संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| बघता बघता 2023 या वर्षातील शेवटचा दिवस जवळ आला आहे. त्यामुळे सर्वांनाच 2024 या नव्या वर्षाची उत्सुकता लागली आहे. परंतु 2023 वर्षाला अलविदा म्हणताना एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की, 2023 च्या शेवटच्या दिवसाची तारीख 12/31/23 आहे. 123123 हे आकडे अंकशास्त्रीय पद्धतीने पाहिला गेलो तर ते आपल्याला काहीतरी मोठा बदल आणि काहीतरी वेगळे संकेत देताना दिसतात. तुम्ही जर 123123 आकड्यांचा संख्याशास्त्रानुसार अभ्यास करायला गेला तर यातून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील.

123 आणि 123123 या अनुक्रमांना देवदूत संख्या म्हणतात. हे आकडे विशेष क्रमांकाचे असल्यामुळे त्यांच्या कडून भविष्याचे संकेत मिळतात, असे अनेकांना वाटते. तसे पाहिला गेलो तर हे आकडे दररोज आपल्याला घड्याळांवर, पावत्यांवर, कॅलेंडरवर दिसतात. परंतु ज्यावेळी 4/3/21 रोजी 4321 किंवा 2/22/22 रोजी 22222 अशा तारखा जुळून येतात, तेव्हा त्याचा अर्थ फक्त दिनांकाशी नसतो तर संपूर्ण जगाशी जोडलेला असतो.

या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी संख्याशास्त्राला समजून घेणे आवश्यक आहे. संख्याशास्त्रानुसार प्रत्येक संख्येचा एक विशिष्ट अर्थ असतो. जेव्हा ते 123 सारख्या पॅटर्नमध्ये एकत्र येतात, तेव्हा प्रत्येक संख्या काय दर्शवते ते पाहून तुम्ही एकूण संदेश समजू शकता. थोडक्यात सांगायचे झाले तर, क्रमांक 1 म्हणजे नवीन सुरुवात होय, क्रमांक 2 भावनांशी आणि चांगला वेळ घालवण्याशी जोडलेला आहे, क्रमांत 3 संख्या शिकणे आणि वाढणे याबद्दल आहे.

त्यामुळे जेव्हा आपण 123 असे आकडे मोजतो तेव्हा काही तरी नवीन सुरू करूयात असा त्याचा अर्थ निघतो. संख्या क्रमाचे महत्त्व समजून घेण्याची दुसरी पद्धत म्हणजे एखादा ठराविक अंक येई पर्यंत इतर अंक जोडत राहणे. उदाहरण द्यायचे झाले तर, 1+2+3 असे आकडे जोडल्यास त्याचे उत्तर सहा असे येते. सहा आकडा पोषण संतुलन आणि प्रेम दर्शवतो. अशाच पद्धतीने आपण 12/31/23 ही तारीख घेऊ शकतो.

12/31/23 तारीख इतकी खास का आहे?

12/31/23 ही तारीख नवीन वर्षाची संध्याकाळ आहे. याला अंकशास्त्रात एक विशेष अर्थ आहे. पुनरावृत्ती झालेल्या 123 क्रमांमुळे हा दुहेरी संदेशासह एका दिवसासारखा आहे. या सर्व आकड्यांची फोड केली तर, 12 क्रमांकाचा अर्थ तुमच्या खर्‍या इच्छा आहेत. 23 आकडा सशक्त आणि स्थिर उर्जा आहे. तर, 31 आकडा केलेल्या नियोजन व्यवस्थित होत नसल्याचा इशारा देतो. त्याचबरोबर, 2023 संख्या सत्य आणि तुमच्या आंतरिक भावनांचे अनुसरण करणारे आहे. 2024 संख्या ऊर्जा आणि तेज दर्शवतो.