स्थानिक गुन्हे शाखेने कुंभेफळ खूनप्रकरणी मुख्य आरोपीस घेतले ताब्यात 

जुन्या भांडणाच्या कारणावरून खून झाल्याचे उघड

औरंगाबाद : करमाड तालुक्यातील कुंभेफळ येथे झालेल्या शेख आमीर शेख नजीर (२०,  राहणार दर्गा मजीदच्या पाठीमागे,  नारेगाव औरंगाबाद) यांच्या खूनप्रकरणी आज स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण)  पोलिसांनी मुख्य आरोपी शेख कामील उर्फ गुडु शेख जमील (वय 23 वर्ष रा.  नारेगाव गल्ली नं 30 औरंगाबाद) या आरोपीस ताब्यात घेतले.

या व्यक्तीचा खून तीन दिवसापूर्वी  झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्यास ऑटोरिक्षामध्ये बसवून त्याला  नशा पाणी करून त्याचा गळा चिरून मारले व त्याचे अंगावर पेट्रोल टाकून जाळले.  त्याचा मृतदेह कुंभेफळ शिवारात इंडियन ऑईल पेट्रोल पंपसमोर एका मोकळ्या प्लॉटींगमध्ये जालना- औरंगाबाद  जाणारे रोडवर मिळाले होते.  खुनाबाबत आरोपी शेख कामील उर्फ गुडू शेख जमिल,  शेख चांद शेख गणी (रा. नारेगाव),  बिहारी पूर्ण नाव नाही (रा. नारेगाव),  एक महिला नाव माहिती नाही.  (रा.  नारेगाव)  या चार जणांनी मिळूनच खून केल्याची कबुली आरोपीने कबुली दिली आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुंदे , पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके,  गणेश राऊत,  श्रीमंत भालेराव,  धीरज जाधव,  विक्रम देशमुख ज्ञानेश्वर मेटे,  संजय तांदळे,  योगेश तरमळे यांनी केली.

 

You might also like