औरंगाबाद : एसबीआयच्या निवृत्त लेखपाल महिलेला फेक कॉल करून क्रेडिट कार्ड कस्टमरवरून फोन करून आपले बंद पडलेले क्रेडिट कार्ड सुरु करायचे आहे का असे म्हणत सव्वा लाखांना फसवले. भामट्याने आधी महिलेला तिच्या खात्याची माहिती सांगितली. त्यामुळे महिलेचा ही भामट्यावर विश्वास बसला. त्यानंतर भामट्याने महिलेच्या क्रेडिट कार्ड वरून एक लाख 22 हजार स्वतःच्या खात्यावर टाकून घेतले.हा प्रकार 23 एप्रिल रोजी घडला. सिडको एन – 4, भागात घडला. गौरव कुमार वर्मा (रा. सी -2, सत्यनगर, जयपूर ) असे या भामट्याचे नाव आहे असे तक्रारीत लिहिले आहे.
टाऊन सेंटर येथील एसबीआय बँकेतून निवृत्त झालेल्या शालूनी गोपाल चांदवणी वय67 (रा. बी – विंग, ब्लु बेल हाऊसिंग सोसायटी, प्रोझोन मॉल) च्या बाजूला त्यांच्याकडे बँकेचे वहीसा क्रेडिट आहे. त्यांना एक लाख 22 हजार रुपयांच्या खर्चची मर्यादा आहे. परंतु बऱ्याच दिवस कार्ड न वापरल्याने ते बंद झाले. त्यानंतर भामट्याने पुन्हा शालिनी यांना बचत खात्याची व डेबीट कार्डची माहिती विचारली. त्यामुळे शालिनी यांना संशय आला. त्यांनी तात्काळ एसबीआयच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअरला संपर्क साधून कार्डच्या मर्यादेबाबत विचारपूस केली.
त्यामुळे शालिनी यांना संशय आला त्यांनी तात्काळ एसबीआयच्या क्रेडिट कार्ड कस्टमर केअरला संपर्क केला. तेव्हा त्यांना कार्डची मर्यादा 1 लाख 22 हजार रुपये असून आताच तुम्ही सर्व पैसे खर्च केल्याचे कळवले. हे एकूण शालेनी यांना धक्का बसला. त्याच्या तक्रारी वरून पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.