Wednesday, February 8, 2023

सोन्याची चमक वाढतेय; गुंतवणुकीची आता योग्य वेळ आहे का?

- Advertisement -

नवी दिल्ली । अमेरिकेसह जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 49 हजारांवर पोहोचला असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

केडिया एडव्हायझरीचे कमोडिटी एक्सपर्ट आणि डायरेक्टर अजय केडिया सांगतात की,”महागाईचा धोका जसजसा वाढेल तसतसा सोन्याच्या किंमतीवरही परिणाम होईल. 49 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचल्यानंतर, MCX वर स्पॉट प्राईस 50 हजारांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव 1,852 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, ही सध्याची सर्वोच्च पातळी आहे. लवकरच तो $1,865 चा नवीन उच्चांक गाठू शकतो.

- Advertisement -

कच्च्या तेलाच्या किंमतीआणि रशिया-युक्रेन तणावाचे पारडे जड होणार आहे
अजय केडिया यांच्या मते, कच्च्या तेलाच्या किंमतीप्रति बॅरल $90 च्या वर राहिल्या आहेत, त्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो, जो नंतर वाढतो. दुसरीकडे, रशिया आणि युक्रेनसोबतच्या वाढत्या तणावामुळे क्रूडच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्यामुळे इंधन महाग होऊन भारतासह जगभरातील महागाईवर परिणाम होणार आहे.