गुंड शरद मोहोळची हत्या करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात; पनवेलमध्ये केली अटक

sharad mohol
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. आता या हत्या प्रकरणातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. रामदास ऊर्फ वाघ्या मारणे असे या मुख्य आरोपीचे नाव आहे. त्यामुळे शरद मोहोळचा खून कशासाठी करण्यात आला होता हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यआरोपी असलेल्या रामदास मारणे याला पनवेल येथील फार्म हाऊसवरून पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याबरोबर विठ्ठल शेलार नावाच्या एका आरोपीला आणि त्याच्या साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केले आहे. या तिन्ही आरोपींना पनवेल पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे शरद मोहोळचा खून कोणत्या कारणासाठी करण्यात आला? यामागे कोणाचा हात होता? याची चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान, 5 जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूड भागामध्ये भर दुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. काही अज्ञात हल्लेखोरांनी एकूण तीन गोळ्या शरद मोहोळवर झाडल्या होत्या. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. मुख्य म्हणजे, हल्लेखोरांना पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी एकाच टीम तयार केली होती. या टीमने केलेल्या तपासातून खुना संबंधित अनेक पुरावे समोर आले. त्यानंतर एकेक धागेदोरे पकडत पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केले.