BSE मधील लिस्टेड छोट्या कंपन्यांची मार्केट कॅप 50,000 कोटींच्या पुढे; जाणून घ्या अधिक तपशील

Stock Market Timing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेज (SME) प्लॅटफॉर्मवर लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपने शुक्रवारी पहिल्यांदाच 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. सध्या BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर 359 कंपन्या लिस्टेड आहेत. त्यापैकी 127 कंपन्या मुख्य बोर्डाकडे ट्रान्सफर करण्यात आल्या आहेत.

BSE SME चे एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन 50,538 कोटींवर पोहोचले आहे
शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्राअखेर या कंपन्यांची एकत्रित मार्केट व्हॅल्युएशन 50,538 कोटी रुपयांवर पोहोचले. अजय ठाकूर, प्रमुख, BSE SME आणि Startups म्हणाले, “हा खरोखर आमच्या इतिहासातील एक संस्मरणीय क्षण आहे आणि आम्हाला याचा खूप अभिमान आहे. स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेज हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्यातील झपाट्याने होणारा विकास हे देशाच्या प्रगतीचे द्योतक आहे.”

EKI Energy ने 1 अब्ज डॉलर्सच्या मार्केट कॅपचा माईलस्टोन गाठला
अलीकडेच BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड EKI Energy ने इतिहास रचला आहे. या कंपनीची मार्केट कॅप 1 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ही कंपनी BSE च्या SME प्लॅटफॉर्मवर लिस्टेड झालेली पहिलीच कंपनी आहे, जिने हे व्हॅल्युएशन गाठले आहे. या कंपनीने लिस्टिंग केल्यानंतर आतापर्यंत 6 हजार टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे.

2011 मध्ये सुरू झालेली, EKI Energy Services ही भारतातील कार्बन क्रेडिट इंडस्ट्री मधील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी एडवाइजरी, कार्बन क्रेडिट ट्रेडिंग, बिझनेस एक्सलन्स एडवाइजरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये सेवा देते. मात्र, कार्बन क्रेडिटचा व्यापार करणे हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे.