सातारा | सातारा तालुक्यातील कोंडवे गावात अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करण्यास लॉज उपलब्ध करून देणाऱ्या लॉज मालकाला पोलिसांनी अटक केली आहे. शंकर शिवाजी चोरगे (रा. कोंडवे ता. जि. सातारा) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लॉज मालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मौजे कोंढवे येथील शंकर शिवाजी चोरगे यांच्या मालकीचा लॉज आहे. येथील लाॅजमधील रुम अल्पवयीन मुलांना गैरकृत्यासाठी उपलब्ध करुन देत असल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दि. 12 रोजी दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेत सापळा रचून दि. 14 जानेवारी 2022 रोजी अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करताना रंगेहाथ लॉजमध्ये पकडले.
तसेच ता कृत्यासाठी सहकार्य म्हणून लॉजमध्ये प्रवेश देणाऱ्या मालकास अटक केली आहे. तसेच या नमुद गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेऊन बाल न्याय मंडाळाचे समक्ष हजर करण्यात आले असून बाल न्यायमंडाळाने त्यास बाल निरीक्षण गृहामध्ये ठेवण्याचे आदेश केले आहेत. या गुन्हयातील मुले ही अल्पवयीन आहेत. याची कल्पना असताना अल्पवयीन मुलांना गैरकृत्य करण्यास मौजे कोडवे येथील स्व मालकीचा लॉज शंकर चोरगे याने उपलब्ध करुन दिला असल्याने सातारा तालुका पोलीसांनी त्यावर अटकेची कारवाई केली आहे.
सदर गुन्हयाचा आधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा व तालुका पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमित पाटील, पोलीस नाईक निलेश जाधव करीत आहेत.