आमदाराची गाडी थेट गर्दीत घुसली; 20 जणांना चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओडिसात एका आमदाराने गर्दीत कार घुसवल्यानं 20 जण जखमी झाले आहेत. बीजेडीचे चिलिका मतदारसंघातील आमदार प्रशांत जगदेव यांच्या गाडीने लोकांना चिरडल्याची घटना घडल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हा अपघात ओडिशामधील खुर्दा जिल्ह्यात शनिवारी दुपारी घडला असून यामध्ये ७ पोलिसांसह 20 जण जखमी झाली आहेत.

या अपघाता नंतर संतप्त झालेल्या जमावाने आमदाराला मारहाण केली आहे. या मारहाणीत आमदार चांगलाच जखमी झाला असून त्याच्यावर तसेच जखमी माणसांवर उपचार सुरु आहेत. या घटनेत कोणीही मृत्यूमुखी पडले नसून घटनेची चौकशी केली जात असल्याचं खुर्दा पोलिस अधीक्षक एसपी अलेख चंद्र पाधी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर ओडिशा राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज हरिशचंद्र यांनी आमदार जगदेव यांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली आहे.