हिटरमधील गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू, आईही भाजली

0
29
child death
child death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड | हिटरमधील गरम पाणी अंगावर पडून तालुक्यातील टाळणेवादी येथील गणेशनगर भागात पाहुण्याच्या घरी राहत असलेल्या आई व मुलाच्या अंगावर 2 जुलै रोजी रात्री हिटर मधील गरम पाणी अंगावर पडले.

या दुर्देवी घटनेत आई किरकोळ भाजली तर मुलगा गंभीर भाजल्याने त्याचा उपचारादरम्यान 5 जुलै रोजी रात्री मृत्यू झाला. आई उपचार करून घरी आली आहे. मुलगा गोरख ज्ञानदेव कारांडे वय 37 व आई सत्यभामाबाई ज्ञानदेव कारांडे वय 75 रा. कळसंबर हे कामासाठी टाळणेवाडी येते आले असता जावई लक्ष्मण शेंगडे रा. टाळणेवाडी यांच्या घरी 2 जुलै रोजी रात्री जेवण करून ते एका खोलीत झोपले होते. बाजूला असलेल्या फायबर कॅनमध्ये हिटरमधील गरम करून ठेवलेले पाणी झोपेत अंगावर पडल्याने यात आई किरकोळ भाजली होती.

सत्यभामाबाई ज्ञानदेव कारांडे यांच्यावर बीड येते उपचार करून घरी आणले होते. मात्र, मुलगा गंभीर भाजल्याने त्याच्यावर औरंगाबाद येते उपचार सुरु होते. मुलाची प्रकृती गंभीर असल्याने 5 जुलै रोजी रात्री मुलाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here