हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणाची आज दुसरी सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर पार पडली आहे. परंतु आजही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. मुख्य म्हणजे, अपात्र आमदार प्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलली गेली आहे. अपात्र आमदार प्रकरणाची पुढील सुनावणी ही येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. परंतु यावर्षी तरी या प्रकरणाचा निकाल न लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्या वेळापूर्वीच शिंदे आणि ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला आहे. दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सुनावणीसाठीची 13 ऑक्टोंबर तारीख दिली आहे.
सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अपात्र आमदारांच्या सुनावणीला उशीर होत असल्याकारणाने फटकारले होते. त्यानंतर त्यांना एका आठवड्याच्या आत सुनावणी घेण्याचे आदेश देखील दिले होते. त्या आदेशानुसार, आज राहून नार्वेकर यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. आजच्या सुनावणीमध्ये, दोन्ही गटांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, सुनावणीचे वेळापत्रक काय असावे? सुनावणी कशी घेण्यात येईल याबाबत चर्चा झाली. यानंतर पुढील सुनावणी ही 13 ऑक्टोंबर रोजी घेण्यात येईल. असे निर्देश राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांना दिले. मात्र आता, यावर्षी तरी अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे म्हणले जात आहे.