अकलूज प्रतिनिधी | वीर धरणातून पाणी सोडल्याने नीरा नदीकाठी असणाऱ्या आकलाई मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. आकलाई देवस्थान अकलूजचे ग्राम दैवत आहे. तसेच हे मंदिर नीरा नदीच्या पात्राला चिटकून असल्याने पाणी मंदिरात शिरले आहे. त्याच प्रमाणे शेजारील रस्तावर देखील पाण्याचे साम्राज्य पसरले आहे.
अकलूजमध्ये शेळ्यांची चोरी करणाऱ्या टोळीला नागरिकांनी विवस्त्र करून दिला चोप ( पहा व्हिडीओ )
आकलाई मंदिराच्या पाठीमागे असणारा ओढा नदीस ज्या ठिकाणी मिळतो त्या ठिकाणी नीरा नदीच्या पुराचे पाणी उलट्या दिशेने आत शिरले आहे. त्यामुळे ते पाणी रस्तावर आले आहे. त्याच प्रमाणे आकलाई मंदिर परिसराची नदीच्या बाजूची संरक्षक भिंत ओलांडून पाणी आत शिरल्याने मंदिर परिसर जलमय झाला आहे. मंदिराचे नवीन बांधकाम झाल्यापासून पहिल्यांदाच पाणी मंदिरात शिरले आहे.
आकलाई देवी अकलूज चे ग्राम दैवत असून या मंदिराचा जीर्णोद्धार मागील काही वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. मंदिर पूर्णतः दगडी बांधकामात बांधण्यात आले असून संपूर्ण परिसराला संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. तरी देखील पुराच्या पाण्याने नदी पात्र सोडल्याने मंदिर जलमय झाले आहे.