कुख्यात गुंड जम्याचा खून करणारा गजाआड;मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : पैशाच्या देवाण-घेवाणीतुन कुख्यात गुन्हेगार जमीर खान शब्बीर खान उर्फ जम्या (25) याचा धारदार शस्त्राने वार करून शुक्रवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी सिटी चौक पोलिसांनी जमीर खानचा साडू शोहेब खान याला अटक करण्यात आल्याची माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. दरम्यान, त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जी. दुबे यांनी दिले.

जमीर खान याचा त्याच्या साडूसोबत पैशाच्या देवाणघेवाणीतुन वाद होता. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटकेही उडत होते. शुक्रवारी जमीर खान शहागंज मंडीतील चंद्रसागर जैन धर्मशाळेच्या समोरील इमारतीच्या शटरजवळ उभा होता. रात्री साडेनऊच्या जमीरचा साडू अन्य एकाला घेऊन तेथे आला. त्यांनी जमीर सोबत वाद घातला. त्याचा वाद टोकाला जाताच साडूसोबतच्या व्यकीच्या धारदार शस्त्राने जमीरच्या छाती, पोट आणि मांडीवर वार केले. छातीवरील वार वर्मी लागल्याने जमीर जागेवरच कोसळला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक मुजगुले यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांच्या पथकाने घटना स्थळाकडे धाव घेतली होती.

Leave a Comment