जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 312 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 10,044 झाली आहे. आज दिवसभरात 214 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 6505 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3070 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 469 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 41, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 10, अमळनेर 25, चोपडा 26, पाचोरा 8, भडगाव 11, धरणगाव 14, यावल 10, एरंडोल 3, जामनेर 63, रावेर 13, पारोळा 17, चाळीसगाव 43, मुक्ताईनगर 13, बोदवड 1 अशी रूग्ण संख्या आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या व करावयाच्या उपाय योजनांबाबत केंद्रिय समितीने केंद्रीय सहसचिव कुणालकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक घेण्यात आली. तसेच केंद्रिय समितीने कोविड रुग्णालयाची व प्रतिबंधित क्षेत्रांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, गोरक्ष गाडीलकर, डीन डाॅ. रामानंद, शल्य चिकित्सक डाॅ चव्हाण उपस्थित होते.
#जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 214 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 6505 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 3070 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 312 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 10044 झाली असून आतापर्यंत 469 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला #waragainstvirus pic.twitter.com/hYw8ryTfSr
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) July 27, 2020