हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत 203 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात 176 रुग्णांचे जीबीएस निदान झाले आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका मध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यातील इतर जिल्ह्यांतही काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चला या बातमीबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
जीबीएस रुग्ण (Guillain-Barré syndrome) –
राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे (Guillain-Barré syndrome) 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात 59 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. खडकवासल्यातील संत रोहिदास नगर येथील रहिवासी असलेल्या या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 10 फेब्रुवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांना अशक्तपणा आणि हालचालींच्या अडचणी होत्या. नंतर त्यांची नर्व्ह कंडक्शन व्हेलोसिटी चाचणी केली गेली, ज्यात जीबीएसचे निदान झाले.
जीबीएसच्या रुग्णसंख्येत वयोवृद्धांची संख्या जास्त –
राज्यभरात 52 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 109 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. जीबीएसच्या (Guillain-Barré syndrome) रुग्णसंख्येत वयोवृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणावर असून, 0 ते 9 वयोगटातील 24 रुग्ण, 10 ते 19 वयोगटातील 24 रुग्ण आणि 20 ते 29 वयोगटातील 44 रुग्ण आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना जीबीएसच्या लक्षणांबद्दल जागरूकता वाढवण्याचे आवाहन केले आहे, तसेच उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे.