रूग्णसंख्या स्थिरच : सातारा जिल्ह्यात नवे 895 पाॅझिटीव्ह तर 810 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 895 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 810 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 9 हजार 305 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 85 हजार 266 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 72 हजार 324 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 4 हजार 166 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दिवसभरात 27 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात 11 हजार 262 जणांचे नमुने घेण्यात आले.

सोमवार ते शुक्रवार बाजारपेठ सुरु : शेखरसिंह
अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 9.00 ते सायं 04.00 वा पर्यत चालु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र मेडिकल, औषधांची दुकाने सकाळी 9.00 ते रात्रौ 8.00 वाजेपर्यंत चालू राहतील. तथापि, हॉस्पीटल मधील मेडिकल, औषधांची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी असेल. अत्यावश्यक नसलेली दुकाने,आस्थापना ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 09.00 ते सायं. 04.00 वा पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी असेल. मॉल, सिनेमागृहे (एक किंवा अनेक पडदी)/ नाटयगृहे इ. पुर्णपणे बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीत हॉटेल, रेस्टॉरंट यांना आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच आठवडयाचे सर्व दिवशी सकाळी 07.00 ते रात्रौ 08.00 या कालावधीत घरपोच पार्सल सेवा चालू ठेवण्यास परवानगी असेल. लॉजिंग, बोर्डींग चालू ठेवण्यास परवानगी असेल. तसेच लॉजिंग मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना सकाळी 07.00 ते सायं 04.00 या कालावधीतच रेस्टॉरंट मध्ये सेवा देता येईल व त्यानंतर त्यांचे वास्तव्य असलेल्या रुम मध्ये सेवा पुरविणे बंधनकारक असेल.

Leave a Comment