मध्यवर्ती बसस्थानकातून ‘या’ मार्गावर धावली एकमेव लालपरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता हळूहळू मिटताना दिसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून काही मार्गावर बसेस चालवण्यात येत आहे‌. परंतु, गेल्या दोन दिवसात धावलेल्या काही बसांवर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याने रुजू होणार्‍या चालक-वाहकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आज सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानकातून सिल्लोड मार्गावर एक बस सोडण्यात आली. मात्र, गेल्या दोन दिवसांत बसवर झालेल्या दगडफेकीमुळे सिडको आगारातून दुपारपर्यंत एकही बस धावलेली नाही. त्यामुळे एसटीचा संप अजूनही पूर्णपणे मिटलेला नाही. प्रवासी मात्र बस सुरू होण्याची वाट पहात तासंतास बसस्थानकावर ताटकळत उभे राहत आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मुख्य मागणीसह इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 7 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या संपाचा आज सलग 21 वा दिवस आहे. मात्र अजूनही यावर कुठलाही तोडगा काढण्यात महामंडळाला यश आलेले नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगारवाढीचा निर्णय जाहीर केला होता. मात्र , ती धुडकावून कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसले आहेत. त्यामुळे एसटी संपाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. शनिवारी सिडको बसस्थानकातून जालन्याला 4 बस रवाना झाल्या. मात्र, काही अज्ञातांकडून या बसवर हल्ला झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी सिडको बसस्थानकातून एक तर मध्यवर्ती बसस्थानकातून एक अशा प्रत्येकी दोन बस धावल्या. मात्र आज केवळ मध्यवर्ती बसस्थानकातून सिल्लोडला एकमेव बस रवाना झाली आहे. प्रदीर्घ संपामुळे काही चालक-वाहक कामावर परतत आहे. मात्र, हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने धावणाऱ्या बसेसची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे.

परतलेल्या कर्मचाऱ्याची परिवहन मंत्र्यांकडे तक्रार –
गेल्या अनेक दिवसांपासून संप असल्याने कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याने थेट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे येत्या काळात रुजू झालेले आणि न रुजू झालेले तसेच सुरू होऊनही ज्यांच्यासोबत वरिष्ठांकडून भेदभाव होत आहे, अशा कर्मचाऱ्यांमध्ये वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment