नवी दिल्ली वृत्तसंस्था | सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदीचे राजपुत्र यांच्या उपस्थितीत पाच करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.यात व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक क्षेत्रात सहकार्य वाढविणे याचा समावेश आहे.तसेच त्यांनी मोदी यांच्याशी सुरक्षा करार आणि इतर अनेक मुद्यांवर व्यापक चर्चा केली.
सौदीचे राजपुत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त पत्रकार परिषदेत बोलले. यावेळी सौदीचे राजपुत्र बोलताना म्हणाले की, ‘दहशतवाद आणि अतिरेकी या सामान्य चिंता आहेत आणि सौदी अरेबिया यासाठी भारत तसेच इतर शेजारील देशांना सहकार्य करेल.’ सौदीचे राजपुत्र नुकतेच इस्लामाबाद येथून पाकिस्तानचा दौरा संपवून भारतभेटीवर आले आहेत.
दहशतवाद विरोधी लढण्यासाठी त्यांनी सहकार्य दाखवले असले तरी,आत्ताच झालेल्या पुलवामा हल्ल्यावर ते काही तरी बोलतील असे वाटत असताना त्यांनी मात्र त्याविषयी मौन बाळगले.’भारत आणि पाकिस्तानच्या समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद’ असे सौदी चे राजकुमार म्हणाले.
इतर महत्वाचे –
किसान सभेचा मोर्चा उद्या मुंबईत धडकणार
राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…