हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी खूशखबर आहे. आरबीआय ने बँकांच्या वेळेत बदल केला असून ग्राहकांना आता बँकेत एक तास अतिरिक्त वेळ मिळणार आहे. आजपासूनच म्हणजे 18 एप्रिल 2022 पासून बँकांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार आत्तापार्यंत 10 ला उघडणारी बँक आता सकाळी 9 वाजता उघडणार आहे. तर दुसरीकडे बँका बंद होण्याच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे आता लोकांना दिवसभरात जास्त वेळ बँकिंग सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
कोरोना काळा पूर्वीच बँकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला होता. कोरोनापूर्व काळापासूनच बँका सकाळी 9 वाजता सुरु करण्यात याव्यात असे आदेश आरबीआयने दिले होते. पण कोरोना काळामध्ये पुन्हा बँकेच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आणि बँके उघडण्याची वेळ 10 वाजता करण्यात आली होती. आता सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे आता पुन्हा बँका त्याच्या पूर्वीच्या वेळेमध्ये म्हणजेच सकाळी 9 वाजता सुरु होणार आहेत
एटीएम शिवाय काढू शकणार पैसे-
आता लवकरच एटीएममधून कार्डलेस व्यवहाराची (Cardless Transaction) सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी बँकांमध्ये सुरू आहे. याद्वारे ग्राहकांना UPI द्वारे बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. कार्डलेस म्हणजेच कार्ड न वापरता व्यवहारासाठी RBI हे करणार आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा UPI द्वारे दिली जाईल.