औरंगाबाद | मुल होत नाही म्हणून पतीनेच 55 वर्षीय घरमालकाला पत्नीच्या खोलीत पाठवून बाहेरुन दरवाजा लावून चालल्या जात गैरप्रकार करण्यासाठी मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पिडित विवाहितेने स्वत:ची सुटका करुन पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसही क्षणभर हैराण झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घरमालक व पती या दोघांना अटक केली. सातारा पोलीस ठाण्यात घर मालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
26 वर्षीय पिडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तीचा पती एमआयडिसी वाळूज परिसरातील कंपनीत काम करतो. ते सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दित शेळके नामक व्यक्तीच्या घरात भाडयाने राहत हाेते. 28 मे रोजी शेळकेने अचानक पिडितेच्या घरात प्रवेश केला व गैरप्रकार करण्यास सुरूवात केली. काय झाले, हे कळायच्या आत पिडितेला तीचा पतीच दरवाजाची बाहेरुन कडी लावून बाहेर गेल्याचे कळाल्यावर धक्काच बसला.
त्यानंतर तिने शेळकेच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. आणि थेट सातारा पोलिस ठाण्यात धाव घेतली. निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांना हा प्रकार कळताच त्यांनी पथकाला घरमालकासह पतीला देखील ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर विवाहितेच्या तक्रारीवरुन 30 वर्षीय पती, 55 वर्षीय घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक केली. उपनिरीक्षक अनिता फसाटे अधिक तपास करत आहेत.