मुंबईत पादचारी पूल कोसळला…

1
42
Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील हिमालय पादचारी पूलाचा स्लॅब कोसल्याने ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही भेट दिली.

या दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांमध्ये नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला. रेल्वे आणि मुंबई महानगर पालिका या दोन्ही यंत्रणांनी जबाबदारी झटकली आहे. दुर्घटनाग्रस्त पूल रेल्वेचाच असून त्याची दुरूस्ती मुंबई महानगरपालिका करत होती असे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. मात्र पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेनं रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप महापौरांनी केला.

या पुलाचं गेल्या वर्षीच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं. ऑडिटनंतरही पूल कोसळत असेल तर ही बाब गंभीर आहे. या ऑडिटमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप होतोय. या पुलाची निर्मिती १९८४ मध्ये करण्यात आली होती. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत दिली जाईल. जखमींच्या उपचाराचाही खर्चही राज्य सरकारकडून केला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

 

इतर महत्वाचे –

बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालिकेचा मुर्त्यू

राष्ट्रावादी कडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘या’ कारणामुळे राधाकृष्ण विखे-पाटील नगरमध्ये प्रचार करणार नाहीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here