IIT मद्रास ने बनवले पोर्टेबल रुग्णालय, चार तासात होते तयार 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारतीय औद्योगिक संस्था, मद्रास आणि स्टार्ट अप मोड्युलस हाऊसिंग ने एक पोर्टेबल रुग्णलाय विकसित केले आहे. याचे वैशिष्ट्य असे आहे की दोन लोक मिळून केवळ चार तासात हे रुग्णालय बनवू शकतात. कोरोनाच्या सद्यस्थितीत हे रुग्णालय महत्वाची भूमिका बजावू शकते.  सध्या आयसोलेशन सुविधा उपलब्ध नाही आहेत अशा परिस्थितीत रुग्णांना विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या रुग्णालयांचा वापर होऊ शकतो.

या मेडीकॅब ला पूर्णतः फोल्डेबल बनविण्यात आले आहे. त्यामुळे याच्या ट्रान्स्पोर्टेशनचा खर्च देखील कमी आहे. यात चार झोन आहेत. एक डॉक्टर रूम, एक आयसोलेशन रूम, एक मेडिकल रूम किंवा वॉर्ड आणि दोन बेडच्या आयसीयूची पण व्यवस्था आहे. याला नुकतेच केरळच्या वायनाड मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. येथे या रुग्णालयाच्या युनिट ला कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये लावण्यात आले होते. स्मार्ट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यासाठी हा हे मायक्रो रुग्णालय विकसित करण्यामागचा उद्देश होता.

देशाच्या वेगवेगळ्या भागात संचलित करण्यासाठी हे रुग्णालय बनविण्यात आले आहे. आयआयटी मद्रास ने गुरुवारी सांगितले की, केरळ मध्ये डिप्लॉयमेंट हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटीस टेरविल्लिगर सेंटर फॉर इनोव्हेशन इन शेल्टर च्या ग्रांट सोबत केले गेले. मोड्युलस हाऊसिंग चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम रवींद्रचंद्रन यांनी सांगितले की, केरळ मध्ये या पायलट प्रोजेक्टच्या परिणामांमुळे कमी वेळात छोट्या रुग्णालयांची आवश्यकता लक्षात येऊ शकते. हा प्रोजेक्ट गावांमध्ये खूप यशस्वी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.