पुणे प्रतिनिधी । पुणे महानगर पालिकेच्या नविन इमारती समोरील पुलाखालुन पावसाळ्यात जानेे आता धोकादायक झाले आहे. कारण देखील याला तसेच आहे आणि आपण दुचाकीस्वार असाल तर मग आपला अपघात निश्चित आहे.
पुणे महानगरपालिके समोर असलेल्या या पुलवारील वाहत्या पाण्याचे आउटलेट हे सरळ खाली असलेल्या रस्त्यावर काढले आहे. त्यामुळे ते पाणी थेट जोरात खाली येते. यामुळे खालुन जाणारे अनेक दुचाकीस्वार ऐनवेळी गोंधळून जाऊन अचानक ह्या पाण्याखाली येऊ नये म्हणून स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतात. आणि नेमके हेच कारण अपघाताला आमंत्रण देण्याचे बनते.
विशेष म्हणजे हे सर्व पुणे महानगरपालिके समोर घडत असून देखील महानगरपालिका प्रशासन याबाबत काही उपाययोजना वा प्रतिबंध करण्याचे सोडून अजूनही निद्रिस्त अवस्थेत दिसतात.
मग प्रश्न पडतो की सदर यंत्रणा ही अपघात होण्याची वाट तर पहात नाही ना…??
महत्वाच्या बातम्या
रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड
चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा ; भाजपमध्ये करणार प्रवेश