हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याचा रेल्वे विभागाला मोठा फटका बसत आहे. मात्र आता अशा प्रवासात विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. पुणे रेल्वे विभागाने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाटणीवर आणण्यासाठी त्यांच्याकडून दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात रेल्वे विभागाने तब्बल २८ हजार प्रवाशांकडून २ कोटी ५० लाखांचा दंड वसूल केला आहे.
रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात कारवाई करण्यास रेल्वेने सुरुवात केली आहे. रेल्वेने तब्बल २८ हजार विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात ही कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून दोन कोटी पन्नास लाखांचा दंड वसूल केला आहे. या विशेष मोहिमेमुळे प्रवाशांना वचक बसला आहे. तसेच पुणे रेल्वे विभागाला देखील याचा फायदा झाला आहे.
दरम्यान, रांग जास्त असल्यामुळे किंवा रेल्वेची वेळ झाल्यामुळे अनेक प्रवासी तिकीट न काढता रेल्वे मध्ये चढतात. याचा त्रास तिकीट काढलेल्या प्रवाशांना देखील सहन करावा लागतो. त्यामुळेच ही बाब लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागाने विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत रेल्वे विभागाने २८ हजार प्रवाशांकडून दंड वसूल केला. या दंडाची रक्कम तब्बल २ कोटी ५० लाख होती. ज्यामुळे रेल्वे विभागाचे अर्धे तरी नुकसान भरून निघाले.