दारू पिल्यावर नशा का चढते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक अल्कोहोलचे सेवन करतात. जगातील मद्यपान करणाऱ्या जवळपास 22 टक्के लोकांना मद्यपान केल्यानंतर नशा राहते. याला हँगओव्हर असे म्हणतात. काही लोकांनी जर रात्री पार्टीमध्ये मद्यपान केले, तर दुसऱ्या दिवसापर्यंत हँगओव्हर राहतो. परंतु हा हँगओव्हर सगळ्याच लोकांना होत नाही. काही लोकांना मद्यपान केल्यानंतर हँग ओव्हर होतो. तर काही लोकांना होत नाही. आणि याच भीतीमुळे अनेक लोक दुसऱ्या दिवशी जर ऑफिसला जायचे असेल, तर आदल्या दिवशी दारू देखील पित नाही. परंतु दारू पिल्यानंतर शरीरात असे कोणते बदल होतात? जेणेकरून आपल्याला नशा चढते? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपण जेव्हा अल्कोहोलचे सेवन करतो. त्यावेळी आपल्या शरीरात काही जैविक आणि रासायनिक बदल होतातम हे बदल बराच वेळ आपल्या शरीरात राहतात. याला हँग ओव्हर असे म्हणतात. ज्यामुळे शरीरात विविध लक्षणे उद्भवतात. आता यामागे काय शास्त्रीय कारण आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

हँग ओव्हर झाल्यास शरीरात काय बदल होतात

डिहायड्रेशन

अल्कोहोलमुळे शरीरातील लघवीचे प्रमाण वाढते. म्हणजे शरीरातून जास्त पाणी बाहेर टाकले जाते. आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की, डोकेदुखी तसेच तोंड कोरडे पडणे, थकवा येणे यांसारख्या समस्या जाणवतात.

रक्तातील साखरेची पातळी

अल्कोहोलचे सेवन केल्याने शरीरातील ग्लुकोजची म्हणजे साखरेची पातळी कमी होते. आणि ऊर्जेची कमतरता जाणवते. यामुळे अशक्तपणा येतो, चिडचिडेपणा येतो, थकवा जाणवतो तसेच मेंदूवर देखील याचा परिणाम होतो

जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता

अल्कोहोलचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील बी जीवनसत्वे , पोटॅशियम यांसारखे आवश्यक तत्त्वे आणि खनिजे कमी होतात ज्यामुळे हँग ओव्हर जास्त वाढतो.

हँग ओव्हरची वैज्ञानिक कारणे कोणती?

आपण जेव्हा अल्कोहोलचे सेवन करतो. त्यावेळी आपल्या शरीरात त्याचप्रमाणे मेंदूमध्ये अधिक बदल होत असतात. तसेच अल्कोहोल आपल्या मज्जासंस्थेवर डिप्रेशन मिळून काम करते. म्हणजेच आपल्या मेंदूतील रासायनिक संदेश वाहकांवर याचा परिणाम होतो. याला न्युरोट्रान्समीटर असे म्हणतात. अल्कोहोलचे सेवन केल्यामुळे गामा, अमिनो ब्यूट्रिक ऍसिड वाढते. यामुळे आपल्याला अत्यंत शांत आणि आरामदायी वाटते. तसेच लुटामेट कमी करते. त्यामुळे आपले विचार कमी होतात आणि आपण शांत अवस्थेत पोहोचतो.

अल्कोहोलचा आपल्या शरीरावर प्रभाव संपला की, मेंदू संतुलन तयार करण्यासाठी जीएबीए तयार कमी करण्यासाठी आणि ग्लूटिन वाढवण्यासाठी प्रक्रिया सुरू करतो. हा बदल मेंदूवर उलटा पडतो. आणि अति उत्तेजित होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला अस्वस्थता आणि चिंता जाणवते. मेंदू अधिक संवेदनशील होतो. आणि व्यक्तीच भीती आणि असुरक्षितता वाटू लागते.