या कारणामुळे दसरा हा सन विजयाचा सन म्हणुन साजरा केला जातो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दसरा विशेष | दसरा हा विजयाचा सण आहे. हा पराक्रमाचा सण आहे. पूर्वीही हा सण शेतकरी मोठ्या प्रमाणात साजरा करीत असत. हा कृषीविषयक लोकोत्सव होता. कष्ट केल्यावर या कालात घरात नवीन धान्य आलेले असते. म्हणून दसरा हा एक आनंदोत्सव मानला जात असे. भाताच्या लोंब्या तोडून त्या फुलांसह प्रवेशद्वारावर तोरण म्हणून बांधण्याची प्रथा पडली. हा उत्सव साजरा करून काही शेतकरी लढाईसाठी-स्वारी करण्यासाठी सीमोल्लंघन करीत असत. पूर्वींच्या कृषीविषयक सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले. म्हैसूरमध्ये आजही हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

१) पैठण शहरात कौत्स नावाचा मुलगा वरतंतु ऋषींकडे वेदाभ्यास शिकला. त्यानंतर त्याने गुरूदक्षिणेविषयी विचारले. तेव्हा वरतंतु ऋषींनी गुरुदक्षिणा नको, असे सांगितले. तरी कौत्साचे समाधान झाले नाही. त्याने गुरूदक्षिणेविषयी आग्रह धरला. तेव्हा वरतंतु ऋषींनी १४ कोटी सुवर्णमुद्रा देण्यास सांगितले. कौत्स १४ कोटी सुवर्णमुद्रा आणण्यासाठी रघुराजाकडे गेला. रघुराजाने तीन दिवसांची मुदत मागितली. रघुराजाने त्यासाठी इंद्रावर स्वारी करायचे ठरविले. इंद्राला ते समजले. इंद्राने रात्री कुबेराकडून गावाबाहेरील आपट्याच्या आणि शमीच्या झाडावर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला. रघुराजाने त्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्सास दिल्या. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स वरतंतु ऋषींकडे गेला. परंतु वरतंतुंनी त्यातील १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या. उरलेल्या त्यांनी स्वीकारल्या नाहीत. कौत्स त्या घेऊन रघुराजाकडे गेला. रघुराजाही त्या परत घेईना. शेवटी कौत्साने रघुराजाच्या सांगण्यावरून त्या उरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली ठेवल्या आणि लोकास त्या लुटून नेण्यास सांगितले. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे या दिवशी आपट्याच्या व शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा पडली.

२) महिषासूर राक्षस सर्व लोकांना त्रास देत होता. तेव्हा परमेश्वराने अष्टभुजा देवीच्या रुपात अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत महिषासूर राक्षसाशी तुंबळ युद्ध करून त्यास ठार मारून विजय मिळवला. त्यावेळी देवीने विजया नाव धारण केले होते. म्हणून अश्विन शुक्ल दशमीस ‘विजयादशमी’ हे नाव मिळाले.

३) पांडव अज्ञातवासात राहण्यासाठी म्हणून विराटाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली सर्व शस्त्रे जंगलात शमीच्या झाडावर ठेवली होती. शेवटी अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी सर्व शस्त्रे शमीच्या झाडावरून काढून घेतली. शमीच्या झाडाची आणि शस्त्रांची पूजा केली. तो दिवस अश्विन शुक्ल दशमीचा होता.

४) प्रभू रामचंद्रांचा पणजा रघुराजा सर्व दिशांच्या राजांना जिंकण्यासाठी याच दिवशी निघाले होते.

५) प्रभु रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो हाच दिवस होता.

Leave a Comment