विवाहितेला पेटवून देत पतीसह नातेवाईक फरार

Women Fire
Women Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड | एका विवाहितेचा सात ते आठ वर्षांपासून छळ करून तिला पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी पतीसह सासू जाऊ आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी वैजनाथ येथील थर्मल कॉलनीतील ही घटना आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास पती सासू जावेसह दिराने जीवे मारण्याच्या उद्देशाने मनीषाला पेटवून दिले. या घटनेत विवाहिता गंभीररीत्या भाजली आहे.

या विवाहिते नाव मनीषा रुपेश चव्हाण असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात ते आठ वर्षापासून सासरची मंडळी तिचा सतत छळ करीत होते.  ते चौघे सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन तिला मारहाण करीत होते. यामध्ये सासू विमल किसन चव्हाण, जाऊ आशा दीपक चव्हाण, पती रुपेश किशन चव्‍हाण, दीर दीपक किसन चव्हाण या चौघांचा समावेश आहे. हे चौघे सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन मारहाण करीत होते. या घटनेत विवाहिता गंभीररीत्या भाजली असून सध्या तिच्यावर नांदेड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी चारही आरोपींवर संभाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मनिषाची सासू विमल ताब्यात घेतले असून इतर तिघे फरार आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेंडके करत आहे.