औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यातच कोणाची दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात पुन्हा पंधरा जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. या पंधरा जणांपैकी कोणाला दोन तर कोणाला नऊ महिन्यात पुन्हा कोरोनाने ग्रासले आहे.
महापालिकेकडून दुसऱ्यांदा कोरोना बाधित होणाऱ्यांची नोंद घेण्यात आली.यावेळी ही बाधितांची संख्या पंधरा वर गेल्याचे समोर आले. किमान दोन महिने अंतरानंतर पुन्हा रुग्ण आला तर तो दुसऱ्यांदा बाधित म्हणता येईल. तिसऱ्यांदा कोणाला कोरोना झाल्याचे अजूनही निदर्शनास आले नाही. असे मनपा, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले.
12 ऑगस्ट रोजी 49 व्या वर्षीय व्यक्तीचा तोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. परंतु त्यांना 19 मे 2021 रोजी कोरोना होऊन गेला होता. त्याचबरोबर दुसऱ्यांदा कोरोना होणारे ते एकटेच नसून पंधरा जणांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोना झाल्यानंतर रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढते. यामुळे कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी मदत होते. परंतु याला अपवाद म्हणजे काहींना या अँटीबॉडीज निरुपयोगी ठरतात आणि त्यांना पुन्हा कोरोना होतो. सध्या पंधरा रुग्ण जरी कोरोनाग्रस्त आढळले असले तरी खासगी रुग्णालयात या बाधितांचा आकडा जास्त असू शकतो.