चक्रिवादळामुळे खवळलेल्या समुद्रात जहाज बुडाले; ढेबेवाडीचा पट्ट्या 10 तास लाटांशी झुंज देऊन गावी परतला

0
68
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ढेबेवाडी : तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वत्र चांगलेच थैमान घातले. या वादळात अनेकजण अडकल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याबाबदल चिंता लागून राहिली होती. तर दुसरीकडे चक्री वादळात फसलेल्या अनेकांना आपण जगू कि मरू याचीही खात्री वाटत न्हवती. मात्र, त्यातील काही लोकांनी या संकटाचा एका योध्याप्रमाणे सामना केला. त्यातीलच एक योध्या म्हणजे पाटण तालुक्यातील कुंभारगाव वायचळवाडी येथील सुपुत्र अनिल निवृत्ती वायचळ हा होय. तो चक्री वादळात खवळलेल्या समुद्रात आपले जहाज बुडाले तरी अखेरपर्यंत धैर्याने त्या संकटाला सामोरे गेला. तब्बल दहा तास लाटांशी झुंज दिल्यानंतर तो आपल्या गावी सुखरूप परतला.

आपल्यावर कोणतेही संकट आले किव्हा युद्ध करण्याची वेळ आली तर आपण माघार घ्यायची नाही तर त्याला एका योध्याप्रमाणे धैर्याने सामना करायचा. हे वाक्य गती तंतोतत लागू होत ते कुंभारगाव वायचळवाडी येथील अनिल वायचळ यांना. मुंबईतील अँफकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले अनिल वायचळ हे अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या प्लॅंटवर या कंपनीचे काम सुरू असल्याने सहकाऱ्यांसमवेत काम करीत होते. काम करताना अचानक जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना तौक्ते चक्रीवादळ येत असल्याची माहिती संदेशाद्वारे मिळाली. त्यानंतरही ते बार्जवर तसेच थांबून राहिले.

आपल्यावर एक भलंमोठं संकट येणार असल्याने जहाजावर काम करत असलेले अनिल वायचळ यांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळे त्यांनी आपल्या कुटुंबियांना फोनद्वारे सोमवार दि. १७ रोजी संदेशही पाठवला. त्यानंतर त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला. यात अनेकजण बुडाले. त्यामध्ये अनेकांचे जीवही गेले. या वादळामुळे खवळलेल्या समुद्रातून मात्र अनुपम कोणत्याही परिस्थिती यातून बाहेर पडायचे असा खंबीर निर्धार करीत अनिल वायचळ यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी जहाजावरील असलेल्या लाईफ जॅकेटसह पाण्यात उडी घेतली. या वादळात सुमारे दहा तास एकमेकांच्या हाताला धरून पाण्यावर तरंगत वेळ जाऊ दिली. त्यानंतर दहा तासानंतर रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना नौदलातील बचाव पथकाणे बोटीवर घेऊन किनाऱ्यावर आणले.

तौक्ते चक्रीवादळात समुद्रात अडकलेल्या अनेकजणांना अजूनही बाहेर काढण्याचे काम नौदलातील अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. यात ज्यांना बाहेर काढले त्यांच्याकडून आपल्यावर आलेल संकट किती भयानक होत. याविषयी माहिती दिली जात आहे. या संकटातून दहा तास झुंज देत आपणही कशा प्रकारे बाहेर पडलो याचा प्रसंग अनिल वायचळ यांनीही आपल्या कुटुंबियांना सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here