मुंबई प्रतिनिधी | आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थ आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
या अर्थसंकल्पामध्ये पुढील तीन महिन्यांच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे. दुष्काळ संदर्भातल्या उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, आपत्कालीन खर्च यासाठी तरतूद अर्थसंकल्प मांडतांना करावी लागणार आहे.
हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने जून – जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. दुपारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे,त्यानंतर विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमुळे अनेक घोषणा दिल्या जाण्याची शक्यता आहे,
इतर महत्वाचे –
शोपीयात दोन दहशतवादी ठार, भारत-पाक सैन्यात गोळीबार सुरूच
PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???
मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनावरून, अखेर मूकबधिर तरुणांचे आंदोलन मागे