राज्यातील प्रसिध्द बगाड यात्रा उत्साहात सुरू : बगाडाचा मान बाळासाहेब मांढरेंना मिळाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी बगाड यात्रा आज मंगळवारी दि. 22 रोजी उत्साहात सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील बावधन (ता. वाई) येथे बगाडाचे सोमेश्वर मंदिर परिसरात बगाड आणि बगाड्याचे पूजन होऊन यात्रेस प्रारंभ झाला. बावधनची बगाड यात्रेत यावर्षीचा बगाड्या होण्याचा मान बाळासाहेब मांढरे (शेलारवाडी) यांना मिळाला आहे.

बहिणीला अपत्य प्राप्ती व्हावी यासाठी बाळासाहेब मांढरे यांनी नवस लावला होता, तो पूर्ण झाल्याने गेली 18 वर्षे ते नवस लावण्यासाठी बसत होते. होळी पौर्णिमेला बगाड्याचा मान मिळवण्यासाठी 48 जण कौल लावण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब हणमंत मांढरे यांचा कौल लागल्याने त्यांना बगाड्या होण्याचा मान मिळाला.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/4901042660013122/?app=fbl

 

यंदा बगाड्याचा मान बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा देखील बावधनच्या बगाडास भाविकांची माेठी गर्दी झाली आहे. कृष्णा नदीच्या पात्रात बगाड नेले जाते. तेथून बाळासाहेब मांढरे यांना बगाडावर टांगले जाईल. त्यानंतर मुख्य बगाड यात्रेस प्रारंभ झाला आहे.

Leave a Comment