औरंगाबाद : शिवसेना आमदाराचा रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. वाहतुक कोंडी सोडवताना आमदार अंबादास दानवे यांनी एका रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांती चौकात ट्राफिकजॅम झाले होते. त्यावेळी जवळच असलेल्या शिवसेना कार्यालयात आमदार दानवे यांना याची माहिती मिळाली. यानंतर वाहतूक नियोजनासाठी शिवससैनिकांना सोबत घेऊन दानवे यांनी वाहतूक पोलिसांची मदत केली. यावेळी एक रिक्षाचालक (MH20 EF 3225) बेशिस्तपणे रिक्षा पळवत होता. हे पाहून दानवे यांनी रिक्षा अडवून त्या रिक्षा चालकाच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
आंबादास दानवे यांची स्टंटगिरी; ऑटो चालकाच्या लगावली कानशिलात pic.twitter.com/uW8Bg5nVaO
— Hello Maharastra Aurangabad (@AurangabadHello) June 28, 2021
दरम्यान, राज्यात डेल्टाप्लस व्हेरिएन्टचे सावट पसरले आहे. राज्य शासनाने आज पासून काही निर्बंधही लागू केले आहे. यापार्श्वभुमीवर शहरातील नागरिकांनी संध्याकाळी चार नंतर घरी पोहोचण्याकरता रस्त्यावर एकच गर्दी केली होती. यामुळे शहरातील अनेक भागांत वाहतुक कोंडी पहायला मिळाली.